ही घटना १७७४ मधील असावी याप्रमाणे हरिपंत फ़डके यांच्याबरोबर राघोबा दादांच्या बंदोबस्तासाठी झालेल्या मोहिमेतुन हरिपंत फ़डके यांनी नारो आनंदराव यांना पाठ्वलेल्या ९.७.१७७५ च्या पत्रात सदाशिवपंताचा उल्लेख येतोसिलेदाराची वगैर गुरे व किरकोळ बुलगे देशी जाईल राजश्री मलबा बापु व दोन तीन पागा आहेत ते व राजश्री सदाशिवपंत करमरकर माल गावासंमीप रहावे असा त्याचा आमचा करार आहे..........(2d) यानंतर मात्र उल्लेख आहे तो सवाई माधवरावाच्या लग्नाच्या वेळचा (लग्न तारीख १०.०२.१७८३)
असा श्रीमंत पुजनाचा विधी-(3f)
---- सारी मुत्सदी मंडळी कारभारी व कारकुन व नाना फ़डणीस हरिपंता तात्या ----- नारोपंत चक्रदेव सदाशिवपंत करमरकर गोविंदराव काळे बसले म्हणजे सवाई माधवरांवाच्या लग्नाला सदाशिवपंत करमरकर उपास्थित होते.हा लग्नसोहळा माहिना -दीड माहिना चालु होता. लग्नासंबंधी सर्व कारभार आटोपल्यावर राज्यासंबधी कामकाजे सुरु झाली फ़ौजेच्या खर्चाचे बंदोबस्त केले शिलेदार गादीनी धरणे धरले असता सदाशिवपंत करमरकर यांशी गार्द्यांची कटकट झाली त्या कज्ज्यात सदाशिवपं ठार झाले पुढे फ़ौजेचे खर्चाचा बंदोबस्त सरकारातुन झाला (3g)ही घटना अंदाजे मार्च/एप्रिल १७८३ची असावी अशा प्रकारे थोरले माधवरावांच्या कारकीर्दीत उदयास आलेल्या व सवाई माधवरावांच्या कारकीर्दीपर्यंत सक्रीय भाग घेतलेल्या सदाशिवपंत अनंत करमरकर कुळातील एका कर्तबगार व्यक्तीमत्वाचा अस्त झाला.
२)गणपतराव सदाशिव करमरकर-(3h)
-----------------------------
सवाई माधवरावांच्या निधनांनंतर नाना फ़डणिसांनी राघोबादादांचा मुलगा चिमाजी आप्पा यास शके १७१८(२जुन१७९६)साली दत्तविधान करविले व बाजीराव कैद करविली नंतर पुण्याचा कारभार मुख्यत्वे परशुराम भाऊ पटवर्धन करु लागले त्यांना मदत करणा-यापैकी त्रिंबकराव परचुरे यानी भाऊंस विनंती केली की "आता मा्झ्याने कारभार होत नाही असे बागेत जाऊन राहिले त्यांचे कामावर हरिपंत फ़डके यांचे हाताखाली सदाशिवपंत करमरकर होते त्यांचे चिरंजीव गणपतराव करमरकर यांस परशुरामभाऊ यांनी उभे केले (3h)ही घटना जुलै ऑगस्ट १७९६ मधील असावी अशा रितीने करमरकरांची दुसरी पिढी पेशव्यांच्या कारभारात लक्ष घालु लागली.
वरील दत्तकविधानाच्या वेळी मराठे सरदारांच्यात मतभेद झाले व गट पडले नाना फ़डणीस महाडास निघुन गेले काही जुनी मंड्ळी त्यांच्या गोटात होती महाड येथुन नानांची कारस्थाने चालु झाली परशुरामभाऊ पटवर्ध नांना या कारस्थानाचा सुगावा लागल्यावर श्रींमंत आप्पासाहेब व स्वत:चे दोन चिरंजीव बाबा व दाजिबा यांना घेऊन पटवर्धन पुणे सोडुन जाऊ लागले त्यांच्यामागे मोगलाची व नारोपंत चक्रदेवाची फ़ौज लागलि असता श्रीमंत आप्पासाहेब शिवनेरीच्या किल्ले दाराच्या हवाली करुन स्वत: लढाईवर आले.पण यावेळी त्यांना कैद झाली व मांड्व गडास ठेवले परशुरामभाऊनी पुणे सोडले त्याचदिवशी त्यांच्याकडील मंड्ळीना पुण्यात कैद केली व नाना फ़डणीसाच्या वाड्यांत आणुन ठेवले ही मंडळी कोण?बाहिरोपंत मेंहदळे त्यांचे चिरंजीव अन्याबा राघोपंत थत्ते गणपतराव करमरकर चिंत्तोपंत्त आठविले असे पंचेचाळीस असामी धरुन पायात बेड्या ठोकल्या.हे वृत्त समजताच नाना फ़डणीसाना राग आला व आमच्या वाड्यात बेड्या ठोकायच्या नव्हत्या ’ असं ते त्यांच्या बाजुच्या सरदारांना म्हणाले.नंतर त्या सर्वांची रवानगी वेगवेगळ्या किल्ल्यावर झाली.गणपतरावांना कुठे ठेवले हा उल्लेख मिळाला नाही ही घटना १७९६ मधीलच असावी.(3i)
|